"Dashara

 क्षत्रीय लोकांप्रमाणे इतर सर्व लोक देखील दसरा या दिवशी विद्या ग्रहण करण्यासाठी घराबाहेर पडत. तसेच व्यापारी लोक विजयादशमी च्या या पवित्र दिवशी नवीन दुकान, शोरूम इत्यादींचा शुभारंभ करणे शुभ मानतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी संध्याकाळी शमी वृक्षपूजन केल्याने आरोग्य व धन संपत्ती प्राप्त होते असे मानले जाते.विजयादशमीला आपट्यांची पाने परस्परांना दिले जातात. यालाच सोने लुटणे असेही म्हणतात .घराला आंब्याच्या पानांची आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात .दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे .यंत्रे ,वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या जातात. आणि संध्याकाळी सर्व लोक एकत्र येत सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो