"Datta Jayanti"
दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. दत्त म्हणजे ‘आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे.
अत्री ऋषींची पत्नी अनसूया ही पतीव्रता होती. पतिव्रत्या असल्यामुळे त्यांच्या अंगी एवढे सामर्थ्य होते की इंद्रादी देव घाबरले. ते ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांकडे जाऊन म्हणाले, त्यांच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल; म्हणून यावर आपण काही उपाय करावा. हे ऐकून त्रिमूर्ती त्यांच्या पतिव्रतेची परीक्षा बघण्यासाठी गेले. एकदा अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असताना अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनसूयेकडे भिक्षा मागू लागले. त्यावर अनसूयेने सांगितले, ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असल्यामुळे ते येईपर्यंत थांबा. तेव्हा त्रिमूर्ती म्हणाले, तोपर्यंत खूप वेळ होईल आणि आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न देणे शक्य नसल्यास आम्ही दुसरीकडे जाऊ. तसेच आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता असेही आम्ही ऐकले होते म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत. यावर अनसूयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. अनसूया जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, आपले सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.