"Dhantrayodashi"
अश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयदशी या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात व्यापारी वर्गात व्यापारात वृद्धी व्हावी म्हणून या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याची पद्धत आहे तसेच समुद्र मंथनाच्या वेळेस या दिवशी धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रगट झाले म्हणून हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणून सुद्धा ओळखला जातो एक कथा अशी आहे की हेम राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो तर आपल्या पुत्राने सर्व सुखाचा उपभोग घ्यावा या उद्देशाने राजाने पुत्राचे लग्न लाऊन दिले आणि त्याच्या मृत्यूच्या दिवशी त्याच्या पत्नीने त्याच्या आजूबाजूला सोन्या चांदीने भरलेल्या मोहरा ठेवल्या प्रवेशद्वार सोन्या चांदीने भरून रोखले राजवाड्यात सर्वत्र दिवे लावले तेव्हा यम त्या मुलाला न्यायला सर्प रुपात आला तेव्हा त्याचे डोळे दिव्याच्या प्रकाशाने सोन्या चांदीच्या चमकण्याने दिपतात आणि तो यमलोकात परत जातो तेव्हापासून या दिवशी अपमृत्यु टाळण्यासाठी यमदीप दान करतात