"Ganpati Chatturthi"

चतुर्थीला करा पूजा : प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. या प्रकारे 24 चतुर्थी आणि प्रत्येक तीन वर्षांने अधिमास जोडून 26 चतुर्थी येतात. सर्व चतुर्थीची महिमा आणि महत्व वेगवेगळे आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याचे विशेष महत्त्व आहे.बुधवारी करा पूजा : बुधवार हा दिवस गणपतीचा मानला गेला आहे. या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा आणि आराधना केली पाहिजे.

1. विनायक चतुर्थी : चतुर्थीचे देव आहे शिवपुत्र गणेश. या तिथीला गणपती पूजन केल्याने सर्व विघ्न नाहीसे होतात. भाद्र महिन्याच्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे, ज्याला विनायक चतुर्थी म्हणतात. अनेक जागी ही ‘वरद विनायक चतुर्थी’ आणि ‘गणेश चतुर्थी’ नावाने साजरी केली जाते. या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुख-सौभाग्य लाभतं.

2. संकष्टी चतुर्थी : माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी, माघी चतुर्थी किंवा तीळ चतुर्थी म्हणतात. बार महिन्याच्या अनुक्रमात ही चतुर्थी सर्वात मोठी मानली जाते. चतुर्थी व्रत पालन केल्याने संकटापासून मुक्ती मिळेत आणि आर्थिक लाभ प्राप्ती होते.

3. अनंत चतुर्दशी : अनंत चतुर्दशी भाद्रपद शुक्ल पक्षात येते. डोल ग्यारस नंतर अनंत चतुर्दशी आणि त्यानंतर पौर्णिमा. या दहा दिवसीय गणेशोत्सवानंतर गणेश प्रतिमेचं विजर्सन होतं. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवसापर्यंत गणेश पूजन केलं जातं.

गणेश जन्म

माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हटले जाते.[५०] हा गणपतीचा जन्म दिन होय. जागृती , स्वप्न , सुषुप्ती आणि तुरीय अशा चार अवस्था मानल्या गेल्या आहेत. चतुर्थी ही तुरीयावास्था म्हणजे आत्मिक साधनेची एक अवस्था मानली गेली आहे असे भारतीय तत्त्वज्ञान मानते.[५१]