"Hanuman Jayanti"
रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला असल्याने त्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते.हनुमानाचा जन्म पहाटे सुर्य उगवतांना झाला असल्याने उगवत्या सकाळी हनुमानाचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येतो. संपुर्ण भारतात अनेक ठिकाणी हनुमानाच्या मोठमोठया मुर्ती स्थापीत केल्या आहेत.समर्थ रामदास स्वामींनी अवघ्या महाराष्ट्रभर मारूतीरायाच्या मुर्तींची स्थापना केली आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात सर्वात वेगवान मनुष्याचे मन आहे आणि मनाला पकडण्याचे सामर्थ्य केवळ हनुमानातच आहे.
हनुमान या देवतेविषयी महत्वाच्या गोष्टी –
- हनुमान चालिसा म्हणणार्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते.
- साडे साती असतांना दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारूतीचे दर्शन घ्यावे.
- हनुमानामधे बलतत्वाचा संचार असल्याने स्त्रियांनी त्याचे दर्शन दुरून घ्यावे अशी देखील एक मान्यता आहे.
- हिंदु मान्यतेनुसार हनुमंताला शक्ति स्फुर्ति आणि ऊर्जेचे प्रतिक मानण्यात आले आहे.