"Vasubares"

यया सर्वमिदं व्याप्तं जगत् स्थावरजङ्गमम्। तां धेनुं शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम्॥ जी जगाच्या चराचरात व्यापलेली असून भूत आणि भविष्याची जननी असलेल्या गो मातेला आम्ही नतमस्तक होतो. हिंदु धर्मात गो मातेला महत्वाचे स्थान दिले आहे, वैदिक संस्कृती प्रमाणे गोमातेची पूजा फलदायी असते विशेषतः आश्विन वद्य द्वादशी ( गो वत्स द्वादशी) वसुबारस या दिवसापासून दिवाळी सण साजरा केला जातो, या दिवशी देवी लक्ष्मी गायीचे रूप घेती, त्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी व गो माते विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी गो मातेची वासरासह पूजा करावी याबद्दल आणखी एक कथा अशी आहे की पूर्विकाळी एक राजा आपल्या दोन राण्यासोबत राहत असे त्याच्या राजवाड्यात एक गाय , वासरू व एक म्हैस होती एक राणी गाय वासरू सांभाळायची आणि एक राणी म्हैस सांभाळायची एकदा म्हैस राणीला म्हणाली की दुसऱ्या राणीला गाय वासरू असताना माझा हेवा वाटतो त्यावर राणी म्हणाली की सर्व काही व्यवस्थित करते असे म्हणून तिने गायीचे वासरू कापून गव्हात पुरले कोणाला काही कळाले नाही राजा जेवायला बसत असताना अचानक रक्ताचा पाऊस सुरु झाला तेव्हा राजा घाबरला आणि एक आकाशवाणी झाली की तुझ्या राणीने गायीचे वासरू कापून गव्हात पुरले म्हणून हे सर्व घडत आहे त्यामुळे उद्या वसुबारस या दिवशी गाय वासरू याची पूजा करा प्रसादात व भोजनात दूध सोडून फळे व इतर पदार्थ द्यावे म्हणजे तुझ्या राणीने केलेले पाप नष्ट होईल. तेव्हापासून या दिवशी गाय वासराच्या पूजेचे महत्व आहे.