"Akshaya Tritiya"

असे म्हटले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता.देवी अन्नपूर्णानेला देवी पार्वती चे रुप मानले जाते, देवी अन्नपूर्णेचा जन्म अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी झाला होता. या दिवशी लोक अन्नपूर्णा देवीची पूजा करून गरिबांना दान देतात.दक्षिण भारतातील मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीने कुबेराच्या तपाने प्रसन्न होऊन त्यांना धनाचे देवता बनवले होते. म्हणूनच या दिवशी लक्ष्मी यंत्र आणि भगवान कुबेराची देखील पूजा केली जाते.युधिष्ठिराला अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘अक्षय पात्र’ वरदान म्हणून मिळाले. वनवासा दरम्यान द्रौपदी चे भोजन होत नाही तोपर्यंत या अक्षय पात्रातील अन्न संपत नसेएका कथेनुसार असे ही म्हटले जाते की अक्षय तृतीयेच्या याच शुभ दिवशी भगवान कृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली होती.भविष्यपुराण नुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुग चा आरंभ झाला होता.